मनोगत
थरथरणारे ओठ तिचे शब्दांच्या शोधात भटकत राहिले. स्मरणात आले नाही, ती भीती होती की पूर्णविचार करण्याची चाहूल. डोळ्यांत शब्दांच्या छटा उमटत नाहीत, तिथे फक्त भाव असतात. त्यांचे अर्थ, आपण आपल्या परीने लावतो. तेच अंतिम सत्य असावे, असे काही नाही. त्यांना शब्दांची जोड हवी. अंतःकरणातील सर्वच गोष्टी चेहऱ्यावर उमटत असत्या तर सारेच किती सोपे झाले असते. पण मुखवटेच जर आपली ओळख म्हणून वावरू लागले तर त्यांवर कितीसा विश्वास ठेवणार. पण शब्द तरी कुठे त्यांची कामगिरी पूर्णपणे बजावतात. समोरच्याच्या मानसिकतेवर त्यांचे अर्थ अवलंबून असतात. आपण आपले व्यक्त व्हायचे काम करावे. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायची जवाबदारी आपली नव्हे.
मग आपल्या मनातील मनोगत समोरच्या व्यक्तीला कधी पूर्णतः समजनारच नाही का ? जर समजलेच तर त्याचे प्रतिउत्तर काय असेल ? त्याने पुन्हा प्रश्नचिन्ह तर उभे राहणार नाही ? राहिले तर ही साखळी कधी संपणारच नाही का ?
अश्या कितीतरी प्रश्नांचे काहूर तिच्या मनात उठले आणि शेवटी
तिच्या थरथरणाऱ्या ओठांनी शब्दांना आलिंगन दिले, मुखवटे गळून पडले, डोळ्यांतील भाव खुलून आले, त्यांना अर्थांची साथ लाभली आणि मनोगताला सुरवात झाली.
Written by
Suraj_2310

👌
ReplyDeleteThank you so much
Delete888sport app - jtmhub.com
ReplyDelete888sport 강릉 출장안마 app - 군산 출장샵 check out the best 888sport betting odds and 김천 출장안마 bet 오산 출장마사지 predictions. 울산광역 출장안마 bet365 live score, live sport betting, best football prediction site.