Unplugged Tale
आज अचानक अक्षयचा call आला. अक्षय माझा
लहानपणापसूनचा मित्र. त्याने reunion च्या आमंत्रणासाठी call केला होता.
म्हटले, चला इतक्या वर्षांनी का होईना सगळे
भेटतोय, सगळेच....
मित्राच्या घरी भेटण्याचे ठरले. ठरवलेल्या
दिवशी, ठरवलेल्या दिवशी, न चुकता सगळे हजर झाले. चेहरे जुनेच होते, पण ह्यावेळी
भेटताना अनोळखी वाटत होते. शाळेतल्या आठवणी, किस्से, सध्या कुठे आहे, काय करतायेत,
या सगळ्या गोष्टींवर चर्चासत्र सुरु झाले. चर्चासत्र म्हणण्यापेक्षा ‘गप्पा’ सुरु
झाल्या.
खूप वेळ मित्रांसोबत बोलल्यानंतर मी
त्यांच्यातून थोडे बाजूला आलो आणि ती मला दिसली, ‘राधिका.’
तिचे माझ्याकडे लक्ष नव्हतेच. कसे असणार, सुंदर
मुली त्यांच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाकडे लक्ष देत नाहीत. त्यांना ते सवयीचे
झालेलं असते. थोडासा धीर करून मीच तिच्याशी बोलायला गेलो.
“राधिका !’’ मी तिला हक मारली आणि तिने वळून पाहिले.
“hi, राधेय, कसा आहेस ?’’ खूप दिवसांनी
भेटलेल्या कोणत्याही मित्राला विचारला जाणारा हा पहिला प्रश्न, नाही का ?
“मस्त. मग कस चाललंय आयुष्य ?” मी विचारले.
“अरे, ये माझे वय काय ३०-४० वर्ष नाहीये. आयुष्य
वैगेरे काय.” राधिका म्हणाली.
‘’sorry, पण आज छान दिसतीयेस.” ही गोष्ट मला
तिला खूप वेळापासून सांगायची होती.
‘’thank you, तू ही ठीक-ठाक दिसतोयेस आज...’’ असे
म्हणून ती निघून गेली.
किती विचित्र असते ना, काही क्षण, काही व्यक्ती
आपल्या आयुष्यात परत सुद्धा येतात. फक्त त्यांच्याबद्दल च्या भावना बदलेल्या
असतात.
मी परत मित्रांमध्ये सामील झालो. माझ्या चेहऱ्यावर
अकारण आलेले हसू पाहून, अक्षय च्या सगळे लक्षात आले. तो मला बाजूला घेऊन गेला.
“बोललास तिला ?’’ अक्षयने विचारले.
“काय बोललास का आणि कोणाला ?’’ मी विचारले.
“हे बघ जास्त नाटक नको करू. अरे राधिकाला ?’’
अक्षय म्हणाला.
‘अरे, खूप आधीची गोष्ट आहे रे ती, आता खूप उशीर
झालाय.’’
“हे तुला कस माहित. हे बघ आता आपण लहानही नाही
आहोत. काही नाही होणार. ती घेईल समजून. तू जास्त विचार नको करू, जा बोल तिच्याशी
जाऊन.” असे म्हणून त्याने मला धक्का दिला.
मी पुन्हा तिच्याकडे गेलो.
“राधिका, ऐक ना, थोडे बोलायचे होते.”
ती उठून माझ्यासोबत आली. मी काय बोलणार हे तिला
आधीपासूनच माहित होते का? माहित नाही. आम्ही gallery मध्ये आलो.
“हा बोल, काय बोलायचे होते तुला ?’’ राधिकाने
विचारले.
मी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात
पाहिले. सुरवातीला ती फक्त हसत होती. ती हसत का आहे ? हे ही मला नाही कळले. मी
तिला सांगून टाकले की ती मला खूप आवडते. माझे प्रेम आहे तिच्यावर.पण.....
प्रेम हा शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव
अचानक बदलले आणि ती म्हणाली,
“डोळ्यात पाहिलं की प्रेम, पण स्पर्श आला की
वासना.”
मी तिचा हातात घेतलेला हात लगेच सोडला. आणि तिला
म्हणालो,
“हे बघ माझा तसा काही हेतू नव्हता.”
“मी तरी कुठे म्हटले, तुझा काही हेतू होता
म्हणून. मी हे ही नाही म्हटले, मी बोललेलं तुला लागू होत म्हणून. तुझा तूच अंदाज
बांधलास.” राधिका म्हणाली.
मला काहीच सुचत नव्हते. काय बोलू, काय करू. तिची
नजर चोरून मी तसाच शांत उभा राहिलो.
“काय करतोस सध्या.” तिने मला विचारले.
“मी लेखक आहे.” मी म्हणालो.
“लेखक, पण त्यातही खूप प्रकार असतात.” ती
म्हणाली.
“कविता, कविता लिहितो.”
ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग बोलली.
“कवितेत असतं ते प्रेम. ओसंडून वाहणार प्रेम, पण
त्यातही कुठेतरी वासनेचा अंश असतोच की, नाही का ?” तिने मला विचारले.
“ना नजर, ना स्पर्श, ना कविता. तुझ्या लेखी निर्मळ
असं काहीच नाही का ?” मी तिला विचारले
“नाही”
तिने कसलाही संकोच न करता अगदी सहज उत्तर दिले.
“ असे कसे होईल. मन, ते तर निर्मळ असते ना ?” मी
तिला विचारले.
“ सगळ्या भावनांचा उगम हा मनातच होतो.” ती
म्हणाली.
“मग राहिले काय, मेंदू ?
“ सर्व इंद्रियांवर नियंत्रण तोच तर ठेवतो.
हालचाल तिथूनच होते.” ती म्हणाली.
मला शब्दच सुचत नव्हते. पुढे काय बोलू ?
“ मग आपल्या हाती काहीच नाही का ?” मी विचारले.
“ आहे ना, प्रेम, वासना ह्या प्रत्येकाच्या
व्यैयक्तीक भावना. त्या पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज लागतेच. पण ती गरज
भागवताना, पुढच्या व्यैक्तीला त्यामध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही हे जाणून
त्याचा स्वीकार करणे, हे आपल्या हाती असतं. ह्याला निर्मळता म्हणता येईल.”
“मग तुला माझ्या भावनांमध्ये सहभागी व्हायचे आहे
की नाही ?” मी तिला विचारले.
“नाही”
“ ठीके, पण एक विचारू ?’’
“नाहीचे कारण सोडून दुसरे काहीही विचार.” ती
म्हणाली. आम्ही दोघेही हसलो.
“ तू नाहीच म्हणणार होतीस, मग तू हे सगळे का
सांगितले मला ?”
“ हे सगळे मला लागलेले अर्थ होते. फक्त माझे
होते. तू एक लेखक आहेस, तरी तूच कोड्यात पडलास. म्हटले तुझे प्रश्न सुटले की तुझ्यासोबत इतरांचेही
सुटतील....”
हे शेवटचे बोलून ती निघून गेली. मी थोडा वेळ तिथेच
थांबलो आणि परत आतमध्ये गेलो.
“राधेय “
मागून एक हक आली. ती रुचा होती.
“hi, कशी आहेस ?” पहिला प्रश्न.
“मस्त, आज छान दिसतोयेस तू.............”
Written by
Suraj_2310
मस्त रे भावा 😍😍😍
ReplyDeleteThank you so much Shivaji
DeleteWaah💝
ReplyDeleteThank you Kashti
Deleteभारी..
ReplyDeleteThank you
Delete