Sand Castle Of Dreams
सायंकाळची वेळ होती. सूर्यास्त होत असताना सूर्याची सोनेरी किरणे समुद्र किनार्यावर पसरतात आणि समुद्र किनार्याची वाळू हि तांबूस भासू लागते. अशातच वीस बावीस वर्षांची एक तरुणी (राधिका) आणि तिची मैत्रिणी (स्वारा) समुद्रकिनार्यावर मुक्तपणे चालत येत होत्या. गप्पा गप्पांमध्ये बरेच अंतर चालून झाल. नंतर दमून दोघी एका ठिकाणी विसावल्या. त्यांचा कोमल पायांना झालेला वाळूचा स्पर्श हेच त्यांचा सर्व थकवा घालवण्यासाठी पुरेसे होत.
त्यानंतर काही गप्पांनंतर स्वराला ओली वाळू बघून किनार्यावर किल्ला बनवण्याचा मोह होतो. मग ती लगेच किल्ला बनवण्यासाठी लगबग सुरु करते. राधिका मात्र अजूनही किनार्यावरच मंद झुळूकेच्या जाणीवेत शांतपणे बसली आहे. अखेरीस काही अवकाशानंतर स्वरा तिचा किल्ला बनून पूर्ण करते. बहुधा नसेल तोः फारसा उत्तम धाटणीचा, चौफेर तटबंदी असलेला, सुबक आकाराचा पण तिचा स्वप्नांतील तो तीचा एक राजमहलच होता हे मात्र निश्चित. राधिका मोठ्या कुतूहलाने स्वराच्या किल्ला बनवण्याचा कलेकडे बघते.
अखेरीस किल्ला बनून पूर्ण होतो. स्वरा देखील फार खुश होते. तिचा नाजूक गालांवर उमललेली हास्याची लाली आणि आनंदाने चेहेर्यावर उमटलेले निरागस हास्य हे आसमंताहूनही अधिक सुंदर दिसू लागते. किल्ल्याला बनवून स्वरा राधिका जवळ येऊन बाजूला बसते.
स्वरा : सुंदर दिसतोय ना गं राधा, मी बनवलेला किल्ला ?
राधिका : छानच आहे कि ! मीच तर एव्हाना तुला कित्येकदा बोलली असेल की, स्वरा, “तुझा हाताला कलेची जादूच आहे बरका”.....
स्वरा: हो ग....मला माहितीय ते.....
[ एक समुद्राची लाट येते आणि त्यात स्वरानी बनवलेला संपूर्ण किल्ला हा वाहून जातो. हा घडलेला संपूर्ण प्रकार पाहून स्वरा दुखी होते. मात्र राधिका ह्या प्रसंगी शांत आणि अविचल असते. ]
राधिका : स्वरा..... हेच आहे आपले आयुष्य. आपल्या स्वप्नांसाठी, नाती टिकवण्यासाठी, काही मिळवण्यासाठी आणि मिळवलेल सर्व काही जपून ठेवण्यासाठी वाट्टेल तितके कष्ट जरी घेतले तरी नियतीसमोर आपण हतबल आहोत ग . तुच बघ, हा किल्ला बनवत असताना तू तुझ्यातली सर्व क्षमता पाणास लावलीस, पण तरीही तो किल्ला नाहीसा व्हायला क्षणाचाही विलंब लागला नाही.
स्वरा : राधिका....खर सांगू का ? जेव्हा मी हा किल्ला बनवत होते ना..... तेव्हा मला कधीच वाटल नव्हते हा किल्ला कायमस्वरूपी असाच राहीन म्हणून.....a
राधिका : हो..... !! मग हा किल्ला तू बनवलास तरी का?
स्वरा: माझ्यासाठी.......
राधिका: काय? म्हणजे तुला म्हणायचं तरी काय?
स्वरा : हो राधिका, माझ्यासाठीच..... जेव्हा मी हा किल्ला बनवत होते ना...... तेव्हा माझ्या मनात एकही प्रश्न डोकावला नाही. मी फक्त माझा किल्ला बनवण्यात मग्न होते. ते बनवण्यात मी स्वतःला अधिकाधिक ओळखू लागले होे. माझी माझ्यासोबतचेच नाते अधिक घटत होत होते आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे माझ्या आवडत्या कामात मी घालवलेला एकूण एक क्षण मला सर्वात सर्वात प्रिय आहे.
राधिका : पण तरी परिणाम काय? तुला प्रिय असणारी गोष्ट गेलीच कि वाहून?
स्वरा: आयुष्यातील सर्वच घटना ह्या काही यश आणि अपयशाच्या तराजूने तोलायचा नसतात...
राधिका : आणि स्वप्न आणि नात्यांबद्दल काय बोलणार मग?
स्वरा : जेव्हा आपण स्वप्न बघतो, त्यासाठी कष्ट घेतो आणि बर्याचदा शेवटी ते मिळवतो देखील....इथवर तर ठीक आहे......पण त्यानंतरही ते सदैव तुमच्याशीच चिकटून रहाव ही आशा करण लोभी मनाच लक्षण आहे. स्वप्ने हि असतात बघण्यासाठी, मिळवण्यासाठी आणि मिळवल्यावर त्याबद्दल कृतज्ञ राहून पुढील स्वप्नांची कास धरण्यासाठी. नात्यांचाही तसाच असत.....काही नाती टिकतात, काही नाही टिकत....पण कुठलच नात हे काही expiry date घेऊन नसत जन्माला येत. आणि नाती तुटली म्हणजे काही आयुष्य संपल असा नाही.....कदाचित त्यानंतर जुळणारी नाती हि अधिक मोलाची असतील...... (राधीकाचे स्मितहास्य)
आयुष्यात यशापयशाची परवा केल्याशिवाय चालत राहणे हेच आपल्या हाती आहे.
राधिका : बरोबर आहे तुझ स्वरा..... ( गंभीर मुद्रेत)
स्वरा : ( स्वरा उभी राहून राधिकाला हाथ देते आणि म्हणते ) मी दुसरा किल्ला बनवायला चाललीये......मदत करशील?
राधिका : काहीही न बोलता स्मित हस्यासह स्वराचा हातात हाथ देते............
written by
Prajjwal Khedkar
Rahul Murudi
Suraj_2310
Comments
Post a Comment