एक दिवस
Chapter One
धडपड लिफ्टने चौथ्या मजल्यावर पोहचलो. कसाबसा
घराजवळ पोहचलो. घराची बेल वाजवली. आजोबांनी दरवाजा उघडला. मला नीट चालताही येत
नव्हते. मला सावरत आजोबा मला माझ्या रूमपर्यंत घेऊन गेले. त्यांनी मला बेडवर
बसवले. आजोबा माझ्यासमोर बसले. मला कळले की आजोबा आज फुकटचे उपदेश देणार. मी
माझ्या मनाची तयारी केली.
“अरे राधेय, काय अवस्था करून घेतली आहेस स्वत:ची
?” आजोबांनी मला विचारले. “अवस्था ? कसली अवस्था ? मला काय झालंय ? I am all good”
असे म्हणून मी उभा राहिलो. पण माझा तोल गेला. मी पुन्हा खाली बसलो. “अरे स्वत:चा
नाही पण किमान आमचा तरी विचार कर. तू जर असा रोजच पिऊन यायला लागलास तर कसे चालेल.
तू college ला पण जात नाहीयेस. कधी घरी असतोस, कधी नसतोस. खूप काळजी वाटते रे
तुझी. बघवत नाहीये तुझ्याकडे असे.”
“आजोबा तुमच्या वेळी बरे होते हो. सगळे काही
आधीच ठरलेलं असायचे. काय करायचंय ? कसे करायचय ? आत्ता एवढे option
आमच्या पुढे मांडून ठेवले आहेत की कळत नाहीये काय करायचे ते. तुमच्या वेळी चार,
पाच गोष्टींसाठी एकच course असायचा. आत्ता प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा course.
साध्या साध्या गोष्टींसाठी स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये मी थोडे माझ्या
मनाप्रमाणे जगलो तर काय चुकले हो माझे. तुमच्या नियमांप्रमाणे नाही जगू शकत मी. या
चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय तुम्ही स्वत:ला. मला कसलंच बंधन नकोय. मला मुक्तपणे
जगायचं आहे. माझ्या मनाप्रमाणे वागायचंय. मला वाटले रोज प्यावीशी तर मी रोज पिईन. I am master of my own ship.” मी नशेत काय बोलत होतो,
मला कळत नव्हते. “बरोबर आहे तुझे. अरे पण असे बेधुंद जगणे ही काय कामाचे जर तुला
कळतंच नसेल तू काय करतोयेस ते.” आजोबा शांतपणे म्हटले. “कळत कसे नाही. मला सगळे
कळतंय. मी माझ्या रूममध्ये बसलोय तुम्ही माझ्या समोर बसला आहात.”
आजोबांना जाणले होते त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाहीये म्हणून. कारण मी
आधीच खूप नशेत होतो. “बर ठीके, माझ्यासाठी एक करशील ?” आजोबांनी मला विचारले. “काय
?” “तुझा एक दिवस मला देशील ?” आजोबांच्या डोक्यात चालू होते याची मला काहीच
कल्पना नव्हती. मी परत त्यांना विचारले. “म्हणजे ? तुम्हाला नक्की म्हणायचे तरी
काय आहे ?”
आजोबांनी मला समजावून सांगायला सुरवात केली. “भले, माझा काळ वेगळा
होता. तुझी genertion वेगळी आहे. आपण एक काम करू. तुझा एक दिवस माझा आणि माझा एक
दिवस तुझा. एक दिवस तू माझ्यासारखे जगायचे. एक दिवस मी तुझ्यासारखे जगणार. ह्या म्हाताऱ्या
आजोबासाठी एवढे करशील ?” मी थोड्या वेळाने उत्तर दिले, “ठीके,चालेल. कधी पासून सुरु
करायचा तुमचा हा नवीन प्रयोग ?” आजोबांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितले, “उद्यापासून....”
मी होकारार्थी मान हलवली.
“तू झोपून जा आत्ता. उद्यापासून तुझा एक दिवस
चालू............”
Written by
Namruta Deshpande
Edited by
Suraj_2310
Nice namruta🤘👌
ReplyDeleteSuraj 👍👍
tysm mayuri
DeleteTy Mayuri 💕
Deleteपुढचा भाग केव्हा?
ReplyDelete