नवे संघर्ष लिहिण्यासाठी
दिला निरोप आज
भरले शेवटचे पान
पुन्हा भरली मनाची झोळी
आठवणींना त्यात दडवले
पुन्हा घेतली नवी diary
नवे संघर्ष लिहिण्यासाठी
झाल्या चुका, मान्य केल्या
तुटलीही काही नाती,
चूक कोणाची ? माझीच ! मान्य केली.
शेवटच्या पानावर मीच आहे
पुन्हा घेतली कलम हाती,
नवे संघर्ष लिहिण्यासाठी
आज इथे उभा या वळणावरती
रस्ता आहेच, फक्त चालायचे आहे
थांबू कुठे तरी वेळ भेटल्यावर
एक प्याला भरण्यासाठी
आजची साक्ष माझी-तुमची
नवे संघर्ष लिहिण्यासाठी
एक नवी सुरवात
ह्या नव्या पानावरती
या सोबतीला सगळे
संघर्ष काय लिहीतच जाईन
कहाणी कुठे एकट्याने पूर्ण होते
या पहाटे तुम्ही आणि मी
चला सुरवात करूया
गोष्ट तुमची-माझी
suraj_2310
happy new year
Kya baat Hai!❤️
ReplyDeletethanx bhai
Delete