After Life
Chapter One
१८ Jan. २०१५
Saturday
खर तर मेल्यानंतर काय diary लिहिणार ? माझे अनुभव वाचून कोणाला काय मिळणारे ?
पण आजही मानवी भावना, वृत्ती यांचे कुतूहल वाटते. जन्माला येताना कोरे करकरीत जीवन
घेऊन आलेले आपण त्याच जीवनाच्या कागदांवर अशी काही कहाणी लिहित जातो की त्याचा शेवट
असा का झाला याचे उत्तरच नसते आपल्याकडे...... पण काय करू राहवले नाही म्हणून
लिहितो आहे.......
राधेय
death – २ Sept.
२०१४
bike accident
drink and drive
त्या दिवशी जरा जास्त झाली होती
खरी. पण घरी जाता येईल अश्या अस्वस्थेत होतो. लेकीन कम्बख्त तकदीर नशेतच शेवटचा
निरोप घेतला. काही regrets नाहीयेत मला. कोणाच्याही माझ्याकडून काही अपेक्षा
नव्हत्या. असल्या तरी काही पूर्ण करून काही मीच मुद्दामून संपवल्या होत्या. वाटले
होते मेल्यानंतर तरी सुटेन मी. पर साला माझी कोणती इच्छा अपूर्ण राहिली माझे मलाच
नाही माहिती ते इथे अडकून पडलोय. अपुऱ्या इच्छेमुळे की कोणाच्या अधुऱ्या भेटीमुळे, का दुसरे काही, असो इथे आलो हेच शेवटी खरे. इथे आल्यावर कळले की भूतांचीही वेगळी
university असते. जिथे इतरांना कसे टरकवायाचे हे शिकवतात. म्हटले चला काहीतरी आहे
जे मी उत्तम रीतीने करू शकतो.पूर्ण course complete केला आणि final project साठी
किमान दहा लोकांना घाबरवायचे असे सरांनी सांगितले. आयुष्यात पहिल्यांदा कोणातरी
गोष्ट मनापासून करत होतो, ह्यात तरी यश मिळवायचे असे मनाशी ठरवले आणि मी बाहेर
पडलो.
एक जागा शोधली. सुनसान, शांत.
जिथे लोक सहसा एकांत शोधायला येतात. एकट्या पडलेल्या माणसाला घाबरवणे काही अवघड
काम नसते. खूप दिवस वाट बघितली कोणीच नाही आले. दुसरी जागा शोधायला लागणार असे
वाटत होते तेवढ्यात एक मुलगा तिथे आला. साधारणता २३-२४ वयाचा असेल. “किती चा का
असेना, आपण आपले काम चोख करायचे.” मी स्वत:लाच म्हणालो. तो येऊन तिथल्या एका
बाकावर बसला. उदास, हताश, कसल्यातरी विचारात हरवल्यासारखा. म्हटले, “हीच ती वेळ”
आणि मी सुरवात केली.
पालापाचोळ्यांचा आवाज केला, मंद
वाऱ्याचा झोत त्याच्या अंगावर सोडली. पण त्याला काहीच फरक पडला नाही. तो
ज्याप्रमाणे मान खाली घालून बसून होतो तो तसाच होतो. काहीच हालचाल नाही. मी मागून
गेलो आणि मोठ्याने ओरडलो.
“ह्या !!!!!!!!!!!!”
त्याने माझ्याकडे इतक्या हताश चेहऱ्याने बघितले की काही काळासाठी मलाच त्याची
भीती वाटली. मी त्याच्यापासून थोडा बाजूला आलो.
“साला, सरांचं ऐकायला पाहिजे होत. हाताची नखे वाढवून आणि पाय वाकडे करून यायला
पाहिजे होत. भवानीलाच न्याट लागला राव, हट”
मी पुन्हा त्याच्याकडे गेलो.
“ ऐक ना मित्रा, असा चेहरा कसा बनवायचा ?”
“मला कळले नाही ?”
“असा हताश चेहरा, ज्याने करून लोक मला घाबरतील.”
“ पण तुम्हाला लोकांना भीती का दाखवायची आहे ?”
“मी समजावतो”
मी त्याला माझी पूर्ण कहाणी सांगितली.
“ तुझा हा चेहरा बघून मी ही काही वेळासाठी घाबरलो. मग विचार कर बाकीच्यांचे
काय होईल ते.”
“तुम्ही भूत आहात ?”
“तू भीतीमुळे विचारतोय की curiosity ने ?”
“भीती!!!!!!”
तो सोम्य हसला.
“भीती त्यांना वाटते ज्यांच्याकडे मन असते. माझे मन तर तेव्हाच तुटले जेव्हा ती सोडून गेली आता
फक्त त्याचे तुकडे राहिलेत.”
त्याच्या त्या शब्दांनी मला त्याची कीव आली पण नवल नाही वाटले. और एक मजनू.
ह्याला समजावावे असे वाटले.
“ जब तक झिंदा हो
तब तक इस दिल को
संभालकर रखना ये मेरे दोस्त
मरने के बाद ये किसी के लिये नही धडकता.
“वा, चांगली होती शायरी.”
“ अरे practice नाहीये रे खूप दिवस झाले. नाहीतर मेहफिल रंगवली असती. तरीही
मला कळले नाही सोडून गेली म्हणजे नक्की काय झाले. ?
“ माझा break up झाले. “
“ BC, break up च झाले ना, त्यात काय एवढे.”
त्याच्या डोळ्यातला तो राग बघून मीच माघार घेतली
“ काय सांगतो !!! break up झाला.
कसा झाला पण ? काय झाले पण एवढे........................................... ?”
Suraj_2310
Chapter 2
Tomorrow 8 pm
💓💓class
ReplyDeleteWaiting for second part
thank you so much namruta
DeleteEkadam masta re❤️❤️❤️
ReplyDeletethanx bhai
DeleteWahhhh....!!!! kadak Lihitos Ki Rao....
ReplyDeleteThank you sudhir
ReplyDeleteMast re... Pudhcha chapter lvkr publish kr... We r waiting...
ReplyDeleteky vishy nahi bhava ek no
ReplyDeleteWowww osmmn
ReplyDelete