After Life

                    Chapter 2 



त्या दिवशी तिचा birthday होता.

मी घडाळ्यात पाहिले. आधीच खूप उशीर झाला होता.
“ अरे बापरे, लवकर निघायला हवे नाहीतर आज काही खैर नाही.”
तेवढ्यात आईने आतून आवाज दिला.
“ अक्षय एक काम कर, खाली जाऊन किराणा घेऊन ये.”
“ ये काय ग आई मी सांगितले होते ना तुला, आज मला काही काम सांगू नको म्हणून. मला एक urgent meeting आहे म्हणून.”
“ हो रे माझ्या राज्या. २ वर्ष झाले तुला विषय नाही सोडवता आले. आणि कसली रे meeting. गप जाऊन ये.”
“अग पण......”
“आणि हे मी तुला विचारत नाहिये सांगतीये.”
“ जातोय” आईपुढे कोणाचे काय चालते.
“ शान ते माझं बाळ.”
“ मी लहान नाहीये आता.”
“जा माहितीये.”

मी धावत किराणा मालाच्या दुकानात गेलो. तिथे तर काय विचारूच नका. मी तिथे पोहचलो, एक मुलगी phone वर बोलत होती.
“ हा बोल ना पिल्लू,
काय झालं पिल्लू,
काय सांगतो पिल्लू,
खरंच पिल्लू,
आता बरा आहेस ना पिल्लू,
मी येऊ का पिल्लू,”
मी तिला मधेच थांबवले.
“ऐक ना, पिल्लू म्हणजे पूर्ण विराम नाहीये प्रत्येक वाक्याच्या शेवटी वापरायला.
ते सोडा
हे बघा मला खूप उशीर होतोय तुम्ही जरा please.”
“थांबा हो जरा. काही नाही रे पिल्लू. आहे एक. बर मी तुला थोड्या वेळाने फोन करते हं...
bye पिल्लू, love पिल्लू, miss you पिल्लू.”
“अग हो, बास जीव घेते का आता त्याचा.”
“काय आहे !”
“ही किराणाची लिस्ट.....”
खरंच boyfriend ला पिल्लू म्हणण्यात मुलींना काय कौतुक वाटते त्यांचे त्यांनाच ठावूक. आणि अश्या नावाने बोलवल्यावर कुत्र्या ला हाक मारून जवळ बोलावल्या सारखे नाही वाटत का त्यांना ? अवघड आहे.

मी किराणा घेऊन घरी गेलो. गडबडीत सामान ठेवले आणि निघालो. बाबा hall मध्ये paper वाचत बसले होते.
“ अरे अक्षय थांब. कुठे चालला आहेस. आपल्याला जरा सामंतांकडे जायचं आहे. बाहेर नको जाऊ कुठे.”
मला खरच कधी कधी वाटते जेव्हा लागायला सुरवात होते ना तेव्हा सगळ्या बाजूने लागते. कोणीच कोणतीच कसर नाही सोडतं. मी बाबांना चिडून म्हटले....
“ आजचं, उद्या किंवा परवा नाही चालणार का ? sorry तुम्ही हे मला विचारात थोडीच असाल सांगतच असाल ना ?”
बाबांनी आत स्वयंपाक घरात वाकून बघितले.
“ आईची सावली पडलीये कारट्यावर दुसरे काय...... जा तू आपण नंतर जाऊ.”

मी घराच्या खाली आलो. माझे काही मित्र तिथे बसलेले होते, खूप दिवस झाले त्यांना भेटलो नव्हतो. पण आज वेळ नव्हता, आधीच खूप उशीर झाला होता.
तरी गाडी बाहेर काढताना त्यातल्या एका मित्राने हाक मारलीच.
“ अक्ष्या !
कुठे आहात शेठ. अरे किती दिवसातून दिसतोयेस. थांबत जा कधीतरी आमच्यासोबत पण.”
“अरे काहीही काय....आज नाही थांबू शकणार आज खरंच गडबडीत आहे. sorry खरंच sorry.”
“ हीच का दोस्ती. लडकी क्या मील गयी हमे भूल गये.......
अब तुम्हे कहा हमारी याद आयेगी,
अब कहा तुम्हे हमारी याद आयेगी,
अब तुम्हे Beer कहा,
तुम्हे तो सिर्फ Wine ही पसंद आयेगी.....”

“अरे तसे काही नाहीये.....”
“नाहीये ना, मग चल आमच्या सोबत.”
“आज खरंच नाही जमणार.”
“ जा रे तू पोरगी काय भेटली, मित्रांना विसरलास..”
त्यांना टाळणे आता कठीण होऊन बसले होते.
“बर चला येतो मी. पण लगेच निघणार मी.”

“चालेल रे. येतोयेस हेच खूप आहे आमच्यासाठी....... चल.”

                                                Suraj_2310

Chapter 3 
tomorrow 8 pm





Comments

  1. Yevdha khara nako re lihu🙈😂

    ReplyDelete
    Replies
    1. अजून story बाकी आहे....देखता जा.

      Delete
  2. Suraj concept avadli amhala 👌
    Changli concept ahe masta story challi ahe❤❤

    ReplyDelete
  3. वाचताना इंट्रेस्ट तयार होतोय,मस्त रे!

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts