After Life

                   Final chapter 



“ती निघून गेली.........................”

ह्या वाक्यानंतर तो काहीच नाही बोलला. तो खूप अस्वस्थ झाला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला धीर दिला.
“परत गेला नाहीस तिच्याकडे...?”
काही वेळा नंतर तो बोलला.

“हो गेलो होतो तिच्या class च्या इथे.”
ती class मधून बाहेर आली.
“राधिका....थांब........I am really sorry. मी तुला त्या दिवशी एवढे बोलायला नको होते.”
“मला नाही वाटत आता त्या sorry चा काही उपयोग आहे म्हणून.”
मला खूप राग आला तिचा.
“हे बघ मला हे सगळे तुझ्याशी बोलायचेच होते. त्या दिवशी नशेत ते सगळे बाहेर आल. पण मला नाही वाटत मी काही चुकीचे बोललो. तू विनाकारण चीडतीयेस.”
“काय ?...... विनाकारण, तुला म्हणायचे काय आहे नक्की. ते माझ्याकडे त्या नजरेने बघतात पण मी तरी नाही ना बघत. ह्यात माझा काय दोष.”
“तसे नाही......”
“मग कसे आहे. तुला काय वाटत मला कळत नाही ते सगळ. मग काय करू सगळी नाती तोडत बसू. अशी किती नाती तोडणारे मी.....हेच करत बसू का मी.......”
“पण लांब तरी राहू शकतेस ना त्यांच्यापासून ?”
“ते शक्य नाही. ‘कसेही असले तरी माझे friends आहेत ते’ असं तूच म्हणाला होतास ना त्या दिवशी, आज मी म्हणते.”
“ठीके आहे तर, मग ही आपली शेवटची भेट....”
थोडा वेळ शांत राहून तू बोलली.
“तुला हेच पाहिजे असेल तर...ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घे तू. त्यांच्या भावनांसाठी तू मला जवाबदार ठरवतोयेस. माझ्या मनात कोणाविषयी ही कोणत्याच चुकीच्या भावना नाही आहेत.”
“भावनांचं सोड पण priority नावाचीही गोष्ट असते. तुझी priority ते आहेत मी नाही असेच म्हणायचे आहे ना तुला.”
“हो अगदी बरोबर, जसे त्या दिवशी तुझे friends तुझी priority होते ना तसेच...”
“हे बघ.....”
“मला अजून वाद नाही घालायचा.....”
“have a great life ..........bye.” मी हे नाते इथेच संपवायचे ठरवले.
“I will.....but it was not my fault........bye.”
ह्यावेळी ती गेली ते परत कधीच न भेटण्यासाठी.

त्याला हे सगळे कोणाशी तरी बोलायचे होते. आज तो माझ्याजवळ व्यक्त झाला एवढंच. आता त्याचा भार हलका झाल्यासारखे वाटत होते. डोळ्यात अश्रू होते. याआधी ही तो रडला असेल, पण आज तो मोकळेपणाने रडत होता इतकेच. काही वेळाने त्याने अश्रू पुसले आणि मला विचारले.

“माझी काय चूक होती ? त्यांच्याशी नात तोडून टाक एवढेच म्हणणे होते ना माझं. ह्यात काय कठीण होत.”
मला त्याच्यावर हसू येत होत. मला हसताना बघून त्याला थोडे आश्चर्य वाटले.

“कठीण ! खूप कठीण होते तिच्यासाठी...... जेव्हा आपण एखाद नात जोडतो ना तेव्हा पुढचा-मागचा कसलाही विचार न करता जोडतो. कोणतीही अपेक्षा न बाळगता आपण मैत्री करतो. पण तेच नात जेव्हा तोडाण्याची वेळ येते ना तेव्हा खूप अवघड होऊन बसत. कारण त्या नात्यावर कालांतराने स्वार्थाची झालर चढली जाते. प्रत्येकासोबत कोणता ना कोणता स्वार्थ आहेच. हेच झालं राधिकाच्या बाबतीत.”

त्याला कदाचित पटले नाही ते.
“पण काय गरज आहे त्याची, मी आहे ना.”

“स्वार्थाला व्यक्तीची, नात्याची, भावनांची बंधन नसतात. खरे तर जेव्हा तो निर्माण होतो ना तेव्हा त्या नात्याची आणि त्याची एक नाळ जोडली जाते. दोघांपैकी एक जरी संपले तर दुसरा ही संपतो.”
“मग मी कोणीच नव्हतो का तिच्यासाठी ?”
“होतास.....खूप काही होतास. पण तुझी वेळ चुकली. तुझ्या स्वार्थापुढे तिचा स्वार्थ मोठा ठरला. कारण तू तिच्यासाठी फक्त एक argument करणार बाहुला झाला होतास. तू तिला एक काहीतरी निवडण्यासाठी भाग पाडत होतास. तिने तिला जे हवे होते ते निवडले.
प्रेम हा सुध्दा एक स्वार्थच आहे. आपल्या मनाने स्वीकारलेला. त्याला आपण प्रेम असे गोड नाव दिले आहे. इतरांपेक्षा आपण तिच्यासाठी खूप काही आहोत हा स्वार्थ, इतरांपेक्षा आपल्यासाठी तिच्या वेगळ्या भावना आहेत हा स्वार्थ, आधाराचा स्वार्थ, काळजीचा स्वार्थ, हक्काचा स्वार्थ...... जो की तिने तुझ्या पासून काढून घेतला. स्वार्थाशिवाय या जगात काहीच नाही. तुला फक्त समतोल राखता नाही आला.....”

“मग आता, काय करू मी, या मतलबी दुनियात नाही राहायचं मला.” 
त्याच्या बोलण्याला काहीच अर्थ नव्हता. मी उठलो ते त्याला शेवटचे समजावण्यासाठी.

“ सून दोस्त,
मतलब के बिना तो
हवाये भी नहीं चलती,
एक जगहा ना रुकना
ये उनका मतलब

तू तो इश्क का मारा है,
जिस इश्क के सामने
खुदा ने भी हाथ टेक दिये,
तू तो इन्सान ठहरा
वफ़ा जताते जताते
बेवफाई कर बेठा है तू

उससे अपना हक़
मांगने गया था न तू
ठुकरा दिया ना तुझे,
जब दो मतलब टकराते है
सिर्फ एक जिंदा लोटता है

खामखा अब मत रो
मतलब के जनाजे बर्सोतक चलते है
जब तक उन्हें समशान पोहचायेगा
तू खुद राख बन जा ये गा

अब उठ, एक बात याद रख
अगर पता चले किसीका मतलब तुझे
तो अपने काम से काम रख
ना तू हारेगा
ना वो जीतेंगे.

जा तिच्याकडे परत, ती अजुन प्रमाणिक आहे तुझ्याशी.
खुदा हाफिस...............”


अणि मी तिथून निघून आलो. मला नाही माहित परत त्याचे काय झाले ते. मी माझे सांगण्याचे कर्त्यव्य केले. माझ्या भूत असण्यामुळे नाही तर जीवनाच्या सत्यामुळे तो घाबरला. माझे काम झाले आणि माझ्या बोलण्यामुळे त्याला काही फायदा झाला की नाही माहित नाही. आणि ते शोधून काढायला सुध्दा वेळ नव्हता. अजून project बाकी होतो. एक झाला अजून नऊ बाकी होते.

                                                           Suraj_2310





Part two ?
I don't know.



Comments

Post a Comment

Popular Posts