After Life

                     chapter 3 



मी तिथून निघालो. तिला भेटायचे म्हणून कमी प्यायचे असे ठरवले होते. पण गप्पा गोष्टींमध्ये चुकून जास्त झाली.

मी coffee shop च्या इथे पोहचलो. ती बाहेरच वाट पाहत उभी होती. मी तिच्याजवळ गेलो.

“ I am really sorry राधिका. मला थोडा उशीर झाला.”
“ थोडा उशीर ! आजचा दिवस माझ्यासाठी किती special आहे हे माहित आहे ना तुला ? माझे सगळे friends मला सकाळ पासून call करतायेत, तरी तुला भेटायचे म्हणून मी नाही गेले. आणि तू आत्ता येतोयेस.”
“sorry, sorry. माझं खरंच चुकले. अग मित्र मागेच लागले मग काय करणार थांबावेच लागले.”
“ तू पिऊन आला आहेस.”
“हो, थोडीशी घेतली, मित्रांनी आग्रह केला म्हणून नाहीतर तुला माहिती आहे मी सोडलंय सगळ.”
“शेवटी माझ्या friends म्हणत होत्या तसच झालं. तू ना कधीच सुधारू शकणार नाहीस.”
“कोण ? त्या चोमाड्या.”
“हे बघ माझ्या friends ना काहीही बोललेलं मी ऐकून नाही घेणार. तुला काही अधिकार नाहीये त्यांना काही बोलायचा.”

“ का नको बोलू सांग ना ! का नको बोलू. खर तर आजवर बोललो नव्हतो पण आज बोलतो. तू माझ्या मित्रांना बोललेलं चालत. पण मी तुझ्या friends ना काही नाही बोलायचं. खर सांगू, तुझ्या friends खर तर मला पटतच नाहीत. त्यांना स्वत:च्या आयुष्यात काय चालले आहे ह्याच्यापेक्षा दुसऱ्यांचा आयुष्यात काय चाललंय ह्याचंच ह्यांना कौतुक. ह्याला चोमडेगिरी नाही म्हणणार, तर काय सांग ना ?”

“हे बघ...........”
“ऐक !” मी तिला मधेच थांबवले.

“ माझे मित्र दारू पितात, cigarette ओढतात, पण कसेही असले तरी वेळ पडल्यावर तेच मदतीला येतात ग. माझे फक्त मित्र पण तुझे, best friend, bestie, just friend, close friend, not that close friend, college friend, class friend आणि आता तर नवीनच facebook friend. मला त्यांच्यापसून काहीच प्रोब्लेम नाहीये ग. पण एक सांगू कोणाला सांगू नको, सगळेच तुझ्यावर line मारतात. मला माहितीये ना. प्रत्येक प्राण्याला त्याच्या जातीविषयी सगळ काही माहित असते. म्हणून मी तुला त्यांच्यापासून लांब रहायला सांगत असतो. पण नाही, तुला काही बोललो तर मी तुझ्या स्वातंत्र्यावर बंदी आणतोय, असे म्हणायला तुझ्या friends मोकळ्या. तू तरी घे ना मला समजून.”

तिने शांतपणे सगळे ऐकून घेतले.
“बोल ना, आत्ता का गप्प आहेस तू ?”
“ तू आत्ता शुद्धीवर नाही आहेस. आपण नंतर बोलू ह्या सगळ्या वर........ bye.”

ती जात असताना मी तिचा हात पकडला आणि तिला थांबवले.
“ मला माहिती आहे तू ह्यापुढे मला कधीच नाही भेटणार ते................”

ती......... माझा हात सोडवून घेत निघून गेली.

मी तिथे तसाच उभा.

                                    Suraj_2310



Final chapter 
tomorrow 8 pm



Comments

Post a Comment

Popular Posts